ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार

मुंबई| महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज 6 मार्च सादर होणार आहे. उद्धव ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

गुरुवारी 5 मार्च राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. राज्यातील सुमारे 70 टक्के लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून होती. पण आता यात लक्षणीय बदल होऊन आता 53 टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

मुंबई व नागपूर यांना जोडणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आठ पदरी द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च 55,335 कोटी रुपये आहे. 87 टक्के जमिनीचं भूसंपादन झाले आहे. 2017-18मध्ये थेट परकीय गुंतवणूक 86,244 कोटी रूपये होती. 2019-20मध्ये ती 25,316 कोटी झाली. 60,928 कोटींनी परकीय गुंतवणूक कमी झाली.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 4 मार्चला पार पाडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटलं की, आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं. तसंच पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा.

महत्वाच्या बातम्या-

-सावधान… आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; काढता येणार फक्त 50 हजार रूपये!

-13 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 9 हजार कोटी रूपये; अजित पवारांची माहिती

-औरंगाबादच्या विमानतळाचं नामांतर म्हणजे पराक्रमी महाराजांना दिलेली मानवंदना- जयंत पाटील

-शौचालयाला शिवाजी महाराजांचं नाव नाही; संदीप देशपांडेंचा आरोप प्रसाद लाड यांनी खोडला

-…अन् अजित दोभालांनी पोलिसांना सांगितली जीवा महाला अन् शिवाजी महाराजांची गोष्ट!