“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

मुंबई | एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ज्यांना घरातून बाहेर काढलंय, त्यांच्यावर मी काय बोलू? मी त्यांच्यावर बोलावं एवढी त्यांची लायकी नाही, अशी टीका अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

कुणाच्याही भडकावण्याला मुस्लिम समाजातील तरुणांनी बळी पडू नये. आम्ही त्यांना योग्य वेळी उत्तर द्यायला खंबीर आहोत. सिंहाचं काम डरकाळ फोडणं आहे, त्यामुळे तुम्ही कुणाच्या जाळ्यात अडकू नका, असंही अकबरुद्दीन ओवैसी म्हणालेत.

हा देश जेवढा त्यांचा आहे, तेवढा माझा पण आहे, ना ही त्यांची जहागीर आहे, ना माझी आहे, हा देश सगळ्यांचा आहे. आपण सगळे प्रेमाने राहू, सुखाने नांदू, देशाला पुढे घेऊन जाऊ, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मी मागासलेल्या मुस्लिमांसाठी काम करतोय. भारतात मुस्लिम समाज सर्वांत मागे आहे. राज्यकर्त्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं मत ओवेसींनी यावेळी व्यक्त केलं.

फक्त अमुक एक समाज पुढे गेला म्हणजे देश पुढे जाणार नाही तर देश पुढे जाण्यासाठी सगळ्या धर्माची लोक पुढे गेली पाहिजेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर 

“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी 5 वेळा माफी मागितली असती” 

“माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर…” 

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर 

“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ”