देश

कलम 370 मुद्द्यावर अकबरूद्दीन यांनी पाकिस्तानी पत्रकारांची केली बोलती बंद!

न्यूयॉर्क : काश्मीर मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न करणारं पाकिस्तान आणि चीन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत शुक्रवारी तोंडघशी पडले. UNSC मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी आपला हजरजबाबीपणा मांडत, तथ्यांची मांडणी करतं आणि कुटनितीने दिलेल्या उत्तरांनी पाकिस्तानी पत्रकारांना निरुत्तर केलं.

UNSC ने उलट काश्मीरमधील परिस्थिती सामान्य करण्याची भारतीय प्रयत्नांची प्रशंसा केली. काश्मीर मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी चीनने लाखो प्रयत्न करूनही या बैठकीत कोणतंही अधिकृत निवेदन केलं नाही, असं अकबरुद्दीन म्हणाले आहेत.

बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये पाकिस्तानच्या अनेक पत्रकारांनी सय्यद अकबरुद्दीन यांना सातत्याने काश्मीर आणि मानवाधिकारावर प्रश्न विचारले. पाकिस्तान पत्रकारांनी कलम 370 वरही भारताला प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण अकबरुद्दीन यांनी प्रत्येक प्रश्नाला नेमकं,  आणि मुद्देसूद उत्तर दिलं.

कलम 370 सह अनेक सवलती जम्मू काश्मीरमधून हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय ही अंतर्गत बाब पूर्णपणे भारताची आहे, असं अकबरूद्दीन म्हणाले.

नवी दिल्ली इस्लामाबादशी कधी चर्चा करणार ? असा प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने अकबरुद्दीन यांना विचारला. यावर अकबरुद्दीन आत्मविश्वासाने म्हणाले कि, ‘चला, याची सुरुवात सर्वात आधी मला तुमच्याशी वार्तालाप करून करू द्या. हात मिळवू द्या.’ आणि एकेक करून तिन्ही पाकिस्तानी पत्रकारांशी त्यांनी हस्तांदोलन केलं. नंतर अकबरुद्दीन म्हणाले, ‘मैत्रीचा हात पुढे करुन आम्ही दाखवलं की आम्ही शिमला करारासाठी प्रतिबद्ध आहोत’. आता पाकिस्तानकडून उत्तराची वाट पाहत आहोत.

महत्वाच्या बातम्या-

-अधिकारी असावा तर असा…! तहसीलदाराने पूरग्रस्तांसाठी डोक्यावर उचलल्या तांदळाच्या गोण्या

-काँग्रेस ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा कलम 370 ला विरोध पण ‘या’ कारणास्तव केली मोदींची स्तुती!

-मोदी सरकारचा वेडेपणा थांबणार तरी कधी??; राहुल गांधी भडकले

-सुनील तटकरेंना मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकानं केला शिवसेनेत प्रवेश

-पूरग्रस्तांना गायी, म्हशी द्या; महेश लांडगेंचं दहिहंडी आणि गणेश मंडळांना आवाहन

IMPIMP