लातूर : उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीत रविवारी 77 वर्षीय दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन मराठवाड्यात करण्यात आल्यामुळे याच भागातील साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती होईल, असं मानलं जात होतं. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक सुधीर रसाळ आणि साहित्यिक रा. रं. बोराडे यांची नावं शर्यतीत होती.
बोराडेंनी मराठवाडा साहित्य परिषदेला लेखी, तर रसाळ आणि महानोर यांनी तोंडी नकार दिला. चपळगावकरांनीही पत्र पाठवून आपल्या नावाचा विचार न करण्याची सूचना दिली. त्यामुळे फादर दिब्रिटो यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती.
फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
झुंडीतून होणाऱ्या हत्या… हिंदू धर्माचा अन् प्रभू श्रीरामाचा सगळ्यात मोठा अपमान- शशी थरूर – https://t.co/Ae9OIHPYIi @INCMaharashtra @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShashiTharoor
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
महाराष्ट्राच्या पु़ढच्या मुख्यमंत्र्याच्या नावावर अमित शहांचं शिक्कामोर्तब! https://t.co/1ZYBF4FSBY @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
रामयणातील ‘त्या’ प्रश्नावरुन ट्रोल करण्याऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर- https://t.co/Xl96DnIabk @sonakshisinha
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019