“कुठेही दगड ठेवा अन् त्याला लाल रंग लावा, लगेच मंदिर तयार होतं”

अयोध्या | हिंदू धर्मात कुठेही दगड ठेवा, त्याला लाल रंग लावा आणि एखादा भगवा झेंडा ठेवा. तिथे लगेच मंदिर बांधलं जातं, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलं आहे.

अखिलेश यादव यांनी बुधवारी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भारतीय जनता पक्ष वाराणसीचा मुद्दा जाणूनबुजून उपस्थित करत आहे.

वाराणसीच्या प्रश्नामागे मोठमोठे कारखाने विकले जात आहेत, असा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी भाजप पक्षावर केला आहे.

ज्या वेळी तुम्ही-मी ज्ञानवापी मशिदीवर चर्चा करत होतो, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने एक योजना राबवली. आधी त्यांनी वन नेशन वन रेशन योजना राबवली, आता ते वन नेशन वन इंडस्ट्रियालिस्ट ही योजना चालवत आहे, अशी टीकाही अखिलेश यादव यांनी केली आहे.

देशातील उद्योगपतींना मोठ्या गोष्टी विकल्या जात आहेत. कंपन्या विकल्या जात आहेत. एलआयसी विकत आहेत, विमानतळ विक्रीवर काढले आहेत, ट्रेन विक्रीवर काढल्या आहेत, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, भाजपने अखिलेश यादव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. समाजवादी पक्षाने तुष्टीकरणाची उंची गाठली, याच समाजवादी पक्षाने कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम केलं होतं, असं भाजपने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् चाकरी दुसऱ्यांची करायची” 

 गुजरातमध्ये काँग्रेसला जोर का झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

 सहाव्या राज्यसभा जागेवरून संजय राऊतांचा इशारा, म्हणाले…

 “जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

 संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल