देश

‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली | केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. मात्र याच दरम्यान ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकिटासाठी येणाऱ्या खर्चावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. अखिलेश यांनी ट्विरवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

रेल्वेद्वारे घरी परतणाऱ्या गरीब, असहाय्य मजुरांकडून भाजप सरकारद्वारे पैसे घेण्याची बातमी लज्जास्पद आहे. भांडवलदारांचे कोट्यवधी रुपये माफ करणारी भाजप श्रीमंतांच्या सोबत आणि गरीबांच्या विरुद्ध आहे, हे आज उघड झालं, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, संकटसमयी शोषण सावकार करतात, सरकार नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-आता तुम्ही सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, प्रक्रिया पुर्ण करा -आशिष शेलार

-राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण

-“IFSC सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल”

-‘रडीचा डाव खेळू नका’; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

-“IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जातीये परंतू जनता मूर्ख नाही

IMPIMP