अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेेदवारीसाठी भाजपकडून कँम्पेन

अकोला : शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाच्या युतीचा गड मानल्या जाणाऱ्या अकोला जिल्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार मिळावा. म्हणून भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘कँपेन’ सुरू केले आहे. अकोट येथे नुकतीच भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेत्यांनी विचार व्यक्त करताना स्थानिक उमेदवाराची मागणीचा मुद्दा लावून धरला त्यासाठी ‘गल्ली ते दिल्ली’ हे अभियान चालवण्याचा निर्धार केला आहे.

अकोट विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येत होता. 2009 पर्यंत शिवसेनेने या मतदारसंघात वर्चस्व राखले होते. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात होते.

भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश गणगणे यांना पराभूत करून हा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला. भारिप बहुजन महासंघ तिसऱ्या तर शिवसेना चौथ्या स्थानावर होती.

अकोट मतदारसंघ भाजपकडे कायम राहावा असा, भाजप नेत्यांचा आग्रह नेत्यांचा आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनाजेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील आमदारांसाठी जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आशिर्वाद मागितले.

मुख्यमंत्र्यांनी यात्रेदरम्यान प्रकाश भारसाकळे याचाच नामोल्लेख केला. तेव्हापासून अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. स्थानिक उमेदवार असावा, यासाठी एकत्र येऊन गल्ली ते दिल्ली लढण्याचा निर्धार केला.

भाजपने प्रकाश भारसाकळे यांना 2014 साली उमेदवारी दिली होती. स्थानिकांच्या पाठिंब्याने ते विजयी झाले. मात्र त्यांच्याकडून स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

-“माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत पण मी देशभक्त आहे”

-काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे- दिग्विजय सिंह

-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात घेतली पोलिसात धाव

-भारताचा वेस्ट इंडीजवर 59 धावांनी विजय

-पूरात विखुरलेली घरं सावरण्यासाठी संभाजीराजे सरसावले; जाहीर केली 5 कोटींची मदत