क्या लोकमान्य तिलक आपके बाप नहीं है?; अक्षय कुमारची जबरदस्त जाहिरात

अभिनेता अक्षय कुमारने स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर काही जाहिराती पोस्ट केल्या आहेत. या जाहिराती सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. 

काय आहे पहिल्या जाहिरातीत?

एक कारचालक नो-एंट्रीमध्ये आपली कार नेतो. ट्रॅफिक हवालादार अक्षय कुमार त्याला आडवा येतो. वाहनचालकाला नमस्कार करतो. त्याला सांगतो, “अरे मी तुमच्या बापाला ओळखतो. ते खूप चांगले लेखक होते. मी त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत. आजच सकाळी मी त्यांच्या फोटोला हार घातला.”

अक्षय कुमारचं हे बोलणं ऐकून तो कारचालक म्हणतो संभ्रमात पडतो. तो म्हणतो, ” …पण माझे वडिल तर जिवंत आहेत.”

मग अक्षय कुमार त्या कारचालकाला रस्त्याचे नाव दाखवतो. त्यावर लिहिलेले असते लोकमान्य टिळक मार्ग. मग अक्षय त्याला विचारतो ‘क्या ये आपके बाप का रोड नहीं है?’ तो ‘नहीं’ म्हणतो. त्यावर अक्षय कुमार त्याला म्हणतो ‘तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यूँ ली?’

पाहा व्हिडिओ-

आणखी दोन व्हीडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

-यह रोड आपके बाप की नहीं है?; अक्षय कुमारची डोळ्यात अंजन घालणारी जाहिरात- 

-मैत्रिणींना ट्रिपसी घेऊन जाणाऱ्या मुलाला अक्षय कुमार पकडतो तेव्हा… पाहा व्हीडिओ-