Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार देखील आहे?’; यूट्यूबरचे धक्कादायक आरोप

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला तब्बल 5 महिने उलटून गेले. तरी अद्याप देखील सुशांत प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांत प्रकरणी अनेकांवर गंभीर आरोप करण्यात आले. यातील काही आरोपींची दखल घेत सीबीआयने आपला तपास देखील वळवला. मात्र, सीबीआयने अखेर सुशांतनं आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट केलं आहे.

अशातच आता सुशांत प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव समोर आलं आहे. अभिनेता अक्षय कुमारवर सुशांत प्रकरणी एका यु ट्युबरनं धक्कादायक आरोप केले आहेत. या यु ट्युबरचं नाव रशीद सिद्दीकी असं आहे. रशीदने यु ट्यूबवर व्हिडीओ अपलोड करत सुशांतवर आरोप केले आहेत.

रशीदने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, अक्षय कुमार सुशांतला एम.एस.धोनी सारखा मोठा चित्रपट चित्रपट मिळल्यानं खूष नव्हता. अक्षय कुमारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांसोबत गुप्त बैठक केली होती. याबरोबरच अक्षय कुमारने रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत देखील केली होती, असे आरोप रशीद याने केले आहेत.

रशीदला अक्षय कुमारवर हे बिनबुडाचे आरोप करणं चांगलंच महागात पडलं आहे. सुशांत प्रकरणी खोटे आरोप केल्याचं म्हणत अक्षय कुमारने रशीद सिद्दीकी विरुद्ध 500 कोटींचा मानहा.णीचा दावा दाखल केला आहे.

तसेच रशीदने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी खोटी माहिती पसरवण्यासाठी 15 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप देखील रशीदवर करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रशीदवर गु.न्हा दाखल केला आहे. तसेच अक्षय कुमारने रशीदला नुकसान भरपाईची नोटीस देखील पाठवली आहे.

रशीद सिद्दीकी हा बिहारमध्ये राहतो. रशीदने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा ‘FF News’ नावाचा यु ट्यूब चॅनेल आहे. याच चॅनेलवरून त्याने अक्षयवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी करत असताना सीबीआयला बॉलीवूड मधील ड्र.ग्ज प्रकरणाचा सुगावा लागला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी तपास सुरु केला. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकत एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं.

तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या विरोधात पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं त्याला देखील अ.टक केलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सुटका झाली आहे.

रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावे देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

नेहा कक्करने शेअर केला हनिमूनचा ‘तो’ फोटो, चाहत्यांनीही दिलं भरभरून प्रेम

‘बायकोनेच माझ्या खु.नाची सुपारी दिली’; ‘या’ बड्या भाजप नेत्याचा पत्नीवर धक्कादायक आरोप!

आयकर विभागाची मोठी कारवाई! पृथ्वीराज चव्हाण गजाआड जाणार?

तुम्हाला आवडणारी मुलगी पळवून आणू असं म्हणणाऱ्या ‘त्या’ भाजप नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बे.ड्या!