Uncategorized

कॅनडाचा पासपोर्ट असला तरी देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही -अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या नागरिकत्वावरुन सध्या चांगलंच रान पेटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अक्षयचा एक जुना व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘अराजकीय’ मुलाखत घेतली. त्यामुळे अक्षय कुमारच्या नागरिकत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

अक्षय कुमारच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये कॅनडातील घराबद्दल त्याने वक्तव्य केलं होतं.

-काय म्हणाला होता अक्षय कुमार? पाहा व्हीडिओ-

कॅनडामधील टोरंटो हे माझं घर आहे, मी निवृत्तीनंतर इथेच राहणार आहे. -अक्षय कुमार

या झालेल्या गदारोळावरुन अक्षय कुमारने आता स्पष्टीकरण दिलंं आहे. 

अक्षय कुमारने ट्वीटद्वारे दिलेले स्पष्टीकरण- 

माझ्या नागरिकत्वाकाबाबत अनावश्यक आणि नकारत्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत, हे मला समजत नाही. माझ्याकडे कॅनडाचं पासपोर्ट आहे हे मी गेली सात वर्षात कधी लपवलं नाही आणि नकारणारही नाही.

गेल्या सात वर्षापासून मी कॅनडाला गेलेलो नाही. मी भारतातच राहतो आणि कायदेशीररित्या करही भरतो. भारताला आणखीन मजबूत बनवण्यावर माझा विश्वास आहे.

गेल्या काही वर्षांत मला माझ्या देशाबद्दलचं प्रेम सिद्ध करण्याची वेळ आली नाही. पण सध्या गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. हे पाहून खूप दु:ख होत आहे.

हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी संबंध नसलेला आहे. माझा देश मजबूत करण्यासाठी माझं योगदान नेहमी राहील.   

-अक्षय कुमारचे बॉलिवूडमधील योगदान

अक्षय कुमार लवकरच दाक्षिणात्य सुपरहीट सिनेमा ‘कंचना’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि कियारा आडवानीही अक्षयसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणाार आहे. 

‘कंचना’ या सिनेमीचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं ठेवण्यात आलं आहे. कंचना हा सिनेमा राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. आता हिंदी सिनेमाही लॉरेन्सच दिग्दर्शित करणार आहेत. 

IMPIMP