Top news मनोरंजन

काही लोकांनी अलका कुबल यांना श्रद्धांजली वाहिली; त्यावर अलका कुबल म्हणतात…

मुंबई  | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनानं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. भारतालाही कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील अनेक लोकांना शूटिंग दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. आई माझी काळूबाईमध्ये भूमिका करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनाच्या उपचारादरम्यान त्यांचा मृ.त्यू झाला आहे.

आशालता वाबगावकर यांच्या निध.नानंतर महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अलका कुबल यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची अ.फवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे. तसेच काहींनी अलका कुबल यांनाही सोशल मीडियावर श्रद्धांजली देखील वाहिली आहे. मात्र, सोशल मीडियावर पसरणाऱ्या या अफ.वांवर विश्वास ठेवू नका, असं सांगणारा एक व्हिडीओ अलका कुबल यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावरुन शेअर केला आहे.

‘आई माझी काळूबाई’च्या सेटवरील २२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेल्या 22 जणांमध्ये माझा देखील समावेश आहे, असं अनेकांना वाटलं. काही लोकांनी तर मला सोशल मीडियावर श्रद्धांजलीसुद्धा वाहिली. मात्र, मी स्पष्ट सांगते मला काहीही झालेलं नाही. मी एकदम ठणठणीत आहे. मला कोरोनाची बाधा झालेली नाही, असं अलका कुबल यांनी म्हटलं आहे.

तसेच अलका कुबल यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सेटवरील कोरोना झालेल्या लोकांच्या आरोग्याविषयी सुद्धा माहिती दिली आहे. आई माझी काळूबाईच्या सेटवरील सगळे जण ठणठणीत आहेत. सेटवरील ज्या 22 जणांना कोरोनाची लागण झाली होती ते सर्वजण सुद्धा आत्ता बरे झाले आहेत, असंही अलका कुबल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अलका कुबल यांनी या व्हिडीओ माध्यमातून अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनाविषयी सुद्धा दुः.ख व्यक्त केलं आहे. आशाताई माझ्या आई प्रमाणे आहेत. आई प्रमाणे असलेल्या आशाताईंचं दुर्दैवी निधन झालं आहे. आशा ताईंच्या निधनानं सर्वांनाच दुःख झालं आहे, असं अलका कुबल यांनी म्हटलं आहे.

तसेच आशाताईंना आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्यांचं वय जास्त झालं होतं, आशाताईंना आजारपणात आम्ही बरीच साथ दिली. मात्र, आज त्या आपल्यात नाहीत यावर माझा विश्वास बसत नाही, असं अलका कुबल यांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23) on

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! चौकशी दरम्यान सारा अली खाननं केला मोठा खुलासा म्हणाली…

“शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट करत आहेत”

करण जोहर पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, “माझा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही”

दीपिका पदुकोणची 100 कोटी किंमतीची ‘ही’ गोष्ट सापडलीय संकटात?

कशाला घाबरतोय सलमान खान? सलमाननं स्वतःच केला मोठा खुलासा म्हणाला…