पंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका!

पुणे | आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांबाबत अखेर तोडगा निघाला आहे. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचं एकमत झाल्याचं कळतंय. आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवलं जाणार आहे.

पुण्यात आज अजित पवारांच्या उपस्थितीत वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.

वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

दरम्यान, संतांच्या पादुका पंढरपूरला विमान, हेलिकॉप्टर, बस यापैकी कशाने पोहोचवायच्या हा निर्णय सरकार सर्वांना विश्वासात घेऊन घेईल. पण पादुका दशमीला पोहोचणार ही जबाबदारी माझी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली

-‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

-सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार

-अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!