…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

पुणे | कमीत कमी खर्चात तसेच प्रेमविवाह करणारांसाठी देवाची आळंदी हे हक्काचं ठिकाणं, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आता आळंदीत लग्न करणंही अवघड झालं आहे. कारण आळंदीत लग्न करण्यासाठी देखील आता अट घालण्यात आली आहे.

बाहेरुन येऊन आळंदीत लग्न करण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. वधू किंवा वर आळंदीतील असेल तरच त्यांना आळंदीत लग्न करता येणार आहे. त्यासाठी देखील ५० लोकाची अट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

एरवी हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात आळंदीत लग्न लावली जातात. छोटी छोटी अशी ५०० हून अधिक कार्यालये आणि धर्मशाळा आहे. लगीनसराईत इथं दररोज दोन-तीनशे लग्न पार पडतात. हजारो लोकांच्या हाताला रोजगार मिळतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या या अटीमुळे इथं येऊन स्वतःत लग्न करणारांची तर अडचण होणार आहेच, मात्र आळंदीची आर्थिक घडी सुद्ध विस्कटणार आहे. कारण याच लग्नकार्यामुळे इथं हजारो लोक येतात आणि इथल्या अर्थकारणावर परिणाम करत असतात.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस

-जर मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर…; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

-कोरोनाच्या संकटकाळात राज्यपाल कोश्यारींनी घेतला मोठा निर्णय

-आगामी काळात कृषी विभागासाठी लॉकडाउन नसणार आहे- दादा भुसे

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं दाखवला मनाचा मोठेपणा; राहता बंगला दिला क्वारंटाईनसाठी