‘आमचं बाळ… लवकरच येणार’, आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

मुंबई | 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt ) थाटात पार पडला. या लग्नाला काही बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली होती. जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं आणि अवघ्या काही महिन्यात गुड न्यूज दिली.

आलियाने एक फोटो शेअर केला असून त्यावर ‘आमचं बाळ… लवकरच येणार’, असं कॅप्शन दिलं आहे. आलियाने जो फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्रीच्या पोस्टवर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आणि चाहतावर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होता. रणबीरची बहीण रीधिमा कपूर हिने देखील यावर कमेंट केली आहे.

तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माझ्या बाळांना आता बाळ होणार आहे…’, अशी कॅप्शन तिने फोटो पोस्ट करत दिली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टबद्दल (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) बोलायचे झाले तर, दोघेही अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

शिंदे गटाच्या वतीने वकील हरिश साळवे न्यायालयात बाजू मांडणार; एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क 

“नाच्यांना सुरक्षा देऊन भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचं पितळ उघडं” 

संजय राऊतांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊतही शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत! 

“महाराष्ट्रातील मविआ सरकार आणखी दोन-तीन दिवस चालणार”