रायगड : अलिबाग पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलंय. प्रशांत करणेरकर यांची तीन महिन्यांपूर्वी अलिबाग येथे नियुक्ती झाली होती. त्यांनी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेतल्याने जिल्हा पोलीस दल हादरुन गेलं आहे. प्रशांत कणेरकर यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबागला रुजू झाले होते. अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर ते रजेवर गेले होते. 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. मात्र 16 ऑगस्टला रात्री आठ वाजता ते पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गेले आणि त्यांनी गळफास घेतला.
प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, वारंवार पोलिसांच्या आत्महत्तेच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रवी शास्त्रींच्या निवडीवर कपिल देव म्हणतात…
-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे
-कलम 370 मुद्द्यावर अकबरूद्दीन यांनी पाकिस्तानी पत्रकारांची केली बोलती बंद!
-अधिकारी असावा तर असा…! तहसीलदाराने पूरग्रस्तांसाठी डोक्यावर उचलल्या तांदळाच्या गोण्या
-काँग्रेस ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा कलम 370 ला विरोध पण ‘या’ कारणास्तव केली मोदींची स्तुती!_