“ठरलेल्या तारखेसच होणार सर्व बोर्डांच्या व विद्यापीठांच्या परीक्षा”

मुंबई |  पूर्वनियोजित सर्व बोर्डांच्या परीक्षा व विद्यापीठाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे त्या तारखेस होतील. अशा परीक्षेच्या दरम्यान कोणतेही आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होणार नाही याची खबरदारी संबंधित शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था प्रमुखांनी घ्यायची आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज शाळांच्या संस्थाचालकांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संस्था आणि अंगणवाडी 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जिथे गर्दी होते अशा ठिकाणावर म्हणजे चित्रपटगृहे, मॉल्स, जिम्स, शाळा आहेत अशा ठिकाणांवर आम्ही बंदी घातली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे कोरोना विषाणू महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फोफावला असून आता कोरोना रूग्णाची संख्या आता तब्बल 26 वर पोहोचला आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारूग्ण असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? फिल्डर बॉल शोधून शोधून दमले

-धोक्याची घंटा; कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात!

-आम्ही अगदी सेम टु सेम कॉपी… फडणवीसांसोबतचा टिकटॉक व्हिडीओ होतोय व्हायरल

-शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद- अजित पवार