‘त्यावेळी माझी बायको नातवंडांसह दिवसभर…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

नाशिक | गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. देशातील अनेक ठिकाणी ईडी, सीबीआय, एनसीबी यांचं धाड सत्र सुरू आहे. तर भाजप या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील केला जातोय.

गेल्या काही महिन्यामध्ये महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा सिसेमिरा लागल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे भाजप या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीत नेते करताना दिसत आहेत.

अशातच आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयुष्यातील वाईट आठवणींना उजाळा दिला आहे. एका मुलाखतीत बोलताना छगन भुजबळांनी ही माहिती सांगितली आहे.

भाजप नेत्यांनी अतिशय सुडबुद्धीने कारवाया केल्या आहेत. माझ्यावर एक दोन नव्हे तर तब्बल 18 ते 19 वेळा रेड पडल्या आहेत, अशी माहिती छगन भुजबळांनी बोलताना दिली आहे.

ज्यावेळी रेड पडायची त्यावेळी त्रास व्हायचा. रेड म्हटल्यावर घरात सगळीकडे वस्तू पसरवून ठेवायचे. वस्तू उलट पालट करूत तपासत असत. त्यामुळे त्याचा लहान मुलांवर परिणाम व्हायचा, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

रेड पडल्यावर प्रश्नोत्तरे व्हायची. घरात ताण तणाव असायचा, तो अतिशय वाईट कालखंड होता. धाडी टाकणाऱ्यांना देखील ते पटत नसायचं त्यामुळे ते आधीच कळवायचे उद्या धाड पडणार आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.

धाडीच्या आधीच धाडी टाकणारे कळवत असत की उद्या घरी येत आहोत. त्यामुळे धाडीआधीच माझी पत्नी नातवंडांवर काही धाडीचा परिणाम होऊ नये म्हणून सकाळीच माॅलमध्ये घेऊन जायची, अशी आठवण छगन भुजबळांनी सांगितली आहे.

माझी पत्नी दिवसभर मुलांना माॅलमध्ये फिरवायची आणि रेडचं काम आटोपल्यानंतर त्यांना घेऊन परत घरी येयची, असंही छगन भुजबळांनी सांगितलं आहे.

मनुवाद्यांच्या विरूद्ध जे लढत होते. समतेचा लढा जे देत होते. त्यांच्यावर भाजपच्या मंडळींचा राग होता. माझ्या काही मालमत्ता सील करण्यास सुरूवात झाली होती. खासदार समिर भुजबळांनी देखील त्यावेळी अटक करण्यात आली होती, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, मी ईडीच्या कार्यालयात गेलो त्यावेळी त्यावेळी मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी साॅरी हम मजबूर है, असं म्हणत मला अटक केली. त्यावेळी त्यांच्यावर दबाव होता, हे स्पष्ट दिसत होतं, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”

“मला 24 तासांपैकी 2 तास उचक्या लागतात, माझं एवढं नाव घेतलं जातं”

…म्हणून अनिल देशमुखांची ईडीच्या कोठडीत रवानगी; आलं ‘हे’ कारण समोर