मुंबई | शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात रोज नवीन घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्याचा मोठा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. विभाग आणि सेल तातडीने बरखास्त करण्याचा निर्णय शरद पवारांनी का घेतला याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल यांनी याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. तर राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल शरद पवारांच्या मंजूरीने बरखास्त करण्यात आले आहेत.
फक्त राष्ट्रीय पातळीवरील सर्व सेल आणि विभाग बरखास्त करण्यात आले आहेत. तर राज्यातील सेल आणि विभागांबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
शरद पवारांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक सेल व विभागांवर नव्या नियुक्त्या केल्या जातील. मात्र, कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला यावर आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर प्रफुल पटेल यांनी जारी केलेलं एक पत्र व्हायरल होत आहे. यात शरद पवारांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचं नमूद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ
‘उद्धव ठाकरेंनी ‘ती’ मोठी चूक केली’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
“ठाकरे सरकारने 15 महिने टाईमपास केला, आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून दिलं”
नाना पटोलेंचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी केला शेअर!
‘…तर शिंदे सरकार कोसळेल’; कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांचा मोठा दावा