‘या’ अष्टपैलू खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

मुंबई| क्रिकेटमध्ये दमदार फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसरा परेराने आज (03 मे 2021) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

श्रीलंका क्रिकेटला पत्र पाठवताना परेरा म्हणाले की, निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. युवा क्रिकेटर्सना आता संधी मिळणार आहे. 32 वर्षीय ऑलराऊंडर खेळाडूनं 6 टेस्ट, 166 वन डे आणि 84 टी 20 सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

परेराने घेतलेल्या निर्णयामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. परेराने 12 फेब्रुवारी 2016 रोजी भारताविरुद्ध रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात हॅट्रिक घेतली होती. यासह ब्रेट लीनंतर वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला होता.

त्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानंही त्यांचं खूप कौतुक केलं होतं. परेरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की  मला अभिमान आहे  मी 7 क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

परेराने 2009 मध्ये भारतविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर दोन वर्षांने त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने 2010 मध्ये झिम्बॉब्वे विरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला होता.

परंतु, श्रीलंकाच्या मर्यादित क्रिकेट संघांचे एकवेळी नेतृत्त्व केलेल्या परेराने आगामी वनडे मालिकेपुर्वी निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांना अचंबित केले आहे. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंका बोर्डाचे सीईओ एश्ले डी सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार परेरा हे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी एक खेळाडू म्हणून श्रीलंका क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं आहे आणि काही महान क्षणांचा ते एक भाग आहेत.

 

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला अश्रू अनावर,…

…..म्हणून मला माझा गोरा रंग आवडत नाही, कंगना रणौत…

कोरोना लढ्यात आता विराट-अनुष्काचा पुढाकार, व्हिडीओ शेअर करत…

कोरोनातून बरं झाल्यानंतर आजीने डॉक्टरांना मारली मिठी, पाहा…

कोरोनामुक्त झालेल्या तरूणाने अनोख्या पद्धतीने केला आनंद…