कोरोनाचा झटका पुणे मुंबई ठाण्यासह नागपुरात शाळा, मॉल्स,जिम्स, थिएटर्स बंद!

मुंबई |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमधील जिम्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव तात्पुरत्या स्वरुपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली आहे.

कोरोनासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभे निवेदन दिलं. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसंच सुदैवाने अजूनही 17 लोकांना गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाही आहेत, पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो, असं ते म्हणाले.

ज्यांना ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यातील दोघे सोडले तर सर्व दुबई, फ्रान्स व अमेरिका येथे प्रवास करून आलेले होते. सुदैवाने ज्यांना लागण झाली आहे त्यांच्यात जास्त लक्षणं आढळत नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

जनतेमध्ये भीती आहे म्हणून १० वी आणि १२ वी च्या परीक्षांव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या – 

“एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला त्याच भाजपला आज टोला मारतायत”

-कोरोनामुळे IPL स्पर्धा रद्द न होता या महिन्यात रंगणार IPL चे सामने

“इकडचा कोणी ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही… तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या”

-‘हवा येऊ द्या’मध्ये शाहू महारांजांचा आणि सयाजीराजेंचा अपमान?

-आमदारांच्या चालकांचा पगारही आता सरकार देणार