“भारतातील सगळे एकाच बापाची औलाद…”, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

पुणे | मागील अनेक दशकांपासून आर्य विरूद्ध द्रविड असा संघर्ष पहायला मिळतो. याबाबत अनेक थेअरी देखील ऐकायला आणि वाचायला मिळतात. अशातच विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतातील सगळे एकाच बापाची औलाद आहेत. बंगालचे ब्राह्मण आणि उत्तर प्रदेशातील दलित यांचा डीएनए एकच असल्याचंही मत देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

भारतात राहणाऱ्या सर्वांच जातीच्या लोकांचा डीएनए एकच आहे, असं डीएनए चाचणीतून समोर आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळे आता आर्य द्रविड शेअर संपली आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

अंदमानचे आदिवासी असो, बंगालचे ब्राह्मण असो किंवा दक्षिणेतील नायर आणि उत्तर प्रदेशातील दलित असो, सर्वांचा डीएनए एकच आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

इतका चांगला ताजमहाल बांधू शकतात तर जागाच जागा होती. दुसरीकडे त्यांनी मशिद बांधली असती. पण मशिद बांधणं हे त्यांचं उद्दिष्ठ नव्हतं. भारतीय समाजाचा तेजोभंग करायचा हा उद्देश होता, अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे.

दरम्यान, कोणीतरी ब्राम्हण आहे, कोणीतरी शुद्र आहे, हे विचार आता संपलेले आहेत, असंही फडणवीस म्हणाले आहेत. राष्ट्रवादीवर जातीवादाचा आरोप होत असताना फडणवीसांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भाजपचा ‘हा’ बडा नेता मुंबई पोलिसांच्या रडारवर; अटकेची टांगती तलवार कायम

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ