मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र यावं लागेल- नितीन राऊत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ नागपूरात आहे. मुख्यमंत्र्यांना नागपुरात चॅलेंज देण्यासाठी नागपुरातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसून एक तगडा उमेदवार दिला पाहिजे. त्याला संपूर्ण मदत करायला पाहिजे. तेव्हाच आम्ही मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करु शकतो, असं काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विलास मुत्तेलवार, सतिष चतुर्वेदी, अनिस अहमद, विकास ठाकरे यासर्वांनी आणि मी एकत्र बसून मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिमकडे तगडा उमेदवार देणं गरजेचं असल्याचं राऊतांनी सांगितलं.

उत्तर नागपुरातील काही नगरसेवकांनी दिल्लीत जाऊन नितीन राऊत यांना नागपुरातून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर मी पक्षाकडे उमेदवारी मागितली नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

निवडणुकीत नागपुरातीस चेहरे बदलतील, आघाडी करुन लढताना 288 जागांवर उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

दरम्यान, पहिली 50 उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-