भारतातील सर्व नद्यांना स्त्री समजलं जातं, मात्र ‘या’ एकमेव नदीला पुरुष समजलं जातं; वाचा काय आहे कारण?

मुंबई | भारत हा विविधतेने नटलेला आणि भरमसाठ नैसर्गिक साधनसंपत्ती असलेला देश समजला जातो. भारतात उपलब्ध असणाऱ्या मुबलक नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघायचा, असं देखील म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गात विनामूल्य उपलब्ध असणाऱ्या प्रत्येकंच गोष्टीला पूजनीय मानलं जातं.

भारतात असंख्य छोट्या मोठ्या नद्या वाहतात. या नद्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यातील काही नद्यांना तर आईचा दर्जा देण्यात आला आहे. गंगा, यमुना, सरस्वती यांसारख्या नद्यांना तर अगदी पवित्र मानलं जातं. भारतातील या नद्यांची लोक भक्तिभावाने पूजा करतात.

भारतात सर्व नद्यांना स्त्रीलिंगी उच्चारलं जातं. मात्र, ब्रह्मपुत्रा ही एकमेव अशी नदी आहे, ज्यासाठी पुल्लिंगी उच्चारलं जातं. भारतात काही ठिकाणी तर ब्राह्मपुत्राला नदी ऐवजी ‘नद’ असं देखील म्हटलं जातं. नदीचं पुल्लिंगी रूप नद समजलं जातं.

ब्रह्मपुत्रा नदीची लांबी 3 हजार किलोमीटर एवढी आहे. ही आशियातील सर्वात लांब नदी आहे. कैलाश पर्वताच्या मान सरोवरातून उगम पावलेली ही नदी भारतात 918 किमी, तिबेटमध्ये 1625 किमी तर बांगलादेशात 363 किमी लांब वाहते. आशियातील सर्वात सुंदर नद्यांपैकी ब्रह्मपुत्रा ही एक आहे.

ब्रह्मपुत्रा या शब्दाचा अर्थ ब्रह्माचा पुत्र असा होतो, आणि याच ब्रह्माच्या पुत्राला म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीला देव म्हणून पुजलं जातं. म्हणून भारतातील इतर नद्याना स्त्रीलिंगी तर ब्रह्मपुत्राला पुलिंगी समजलं जातं.

काही लिखित कथांनुसार, ऋषी शंतनूची मुलगी असणाऱ्या आमोघावर ब्रह्मा देव मोहित झाले होते. मात्र, अमोघाने ब्रह्माला स्विकारलं नाही. ब्रह्माने ऋषी शंतनूला सांगितलं की, या संगमातून जन्माला येणाऱ्या आपत्यामुळे सृष्टीला लाभ होईल.

यानंतर ऋषींनी अमोघाला समजावलं मात्र तिने काही ऐकलं नाही. यामुळे ऋषींनी आपल्या शक्तीने अमोघा आणि ब्रह्माचा संगम घडवून आणला. यानंतर अमोघाने एका पुत्राला जन्म दिला. या पुत्राचं नाव ब्रह्मकुंड असं ठेवण्यात आलं.

पुढे ब्रह्मकुंडालाच 4 पर्वतांच्या मध्ये ठेवण्यात आलं. याच ब्राहमकुंडाचं नाव पुढे ब्रह्मपुत्रा असं बनलं आणि आज हेच ब्रह्मपुत्र लाखो लोकांचं जिवनदाता बनलं आहे. ब्रह्मपुत्रा नदीची देखील खूप भक्तीभावाने पूजा केली जाते.

महत्वाच्या बातम्या –

फडणवीसांचा मध्यरात्रीचा पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ; पाहा व्हिडीओ

लज्जास्पद! ‘माझ्या आईला वाचवा डॉक्टर’; मुलांच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं उपचार नाही केला; व्हिडीओ व्हायरल

भर रस्त्यात चालू कारमधून बाळ खाली पडलं, आई मात्र गाडी चालवत पुढे गेली अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्रीनं केला साखरपूडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भिक मागावी लागते याला…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy