नवी मुंबई | पंजाब राज्याचे आपचे पहिले मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. दारु पिऊन प्रवास करत असताना त्यांना विमानातून खाली उतरविल्याचे वृत्त आहे.
भगवंत मान हे दारुच्या नशेत विमान प्रवास करत असताना आढळून आल्याने त्यांच्या सहप्रवाशाने तक्रार केली आणि त्यांना विमानातून खाली उतरविल्याचा आरोप केला जात आहे.
अकाली दलाने (Akali Dal) हा मुद्दा उचलून धरला आहे. आपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मान फ्रँकफूर्टवरुन दिल्ली येत असताना, शेवटच्या क्षणी त्यांचे विमान चुकले आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला.
एका इंग्रजी वृत्तपत्राने जर्मनी दौऱ्यावर असलेल्या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त दिले आहे. मात्र समाज माध्यमांवर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
विरोधी पक्षांनी यावेळी आम आदमी पक्षाला धारेवर धरले आणि सपष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. प्रकृती ठीक नसल्याने मान यांना येण्यास उशीर होत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.
अकाली दलाच्या दाव्यानुसार मान यांच्यामुळे विमानास उड्डाण घेण्यास चार तास उशीर झाला. आणि ते नशेत असल्याने त्यांना विमानातून उतरविण्यात आले.
पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला देखील ते गैरहजर राहीले. त्यामुळे जगभरातील पंजाबी लोकांना लाज आली आहे, असे अकाली दलाचे मत आहे. या प्रकारचे ट्विट सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
वॉट्सएपचे नवीन अपडेट देणार आहे ‘हे’ नवीन फिचर्स; सर्वांना याचीच प्रतीक्षा होती
“…तर महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील” – भास्कर जाधवांची मोठी टीका
भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती; 56100 ते 78800 प्रतिमहा पगारासाठी जागा रिक्त
मोठी बातमी: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत मोठी माहीती समोर
दसरा मेळाव्याबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले शिवाजी पार्क आणि…