मुंबई | राज्यात सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका होत असताना आता शिवसेना विभागप्रमुखामुळं शिवसेना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
विरार येथील साईनाथ नगरमध्ये एका महिलेनं शिवसेना विभागप्रमुखाला चांगलाच चोपला आहे. रिक्षात बसलेल्या व्यक्तीला चपलेनं महिला मारत आहे, असा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
महिला ज्या शिवसेना विभागप्रमुखाला मारत आहे त्याचं नाव जितू खाडे असं आहे. महिला त्याला तुझे सेक्स चाहिये क्या, असं म्हणत म्हणत मारहाण करत आहेत.
रिक्षामध्ये खाडेसोबत एक व्यक्ती आहे तो व्यक्ती देखील खाडेचे हात धरून त्याला मारहाण करत आहे. सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत आहे. अशात शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत.
काॅलवरून सेक्ससाठी महिलांची मागणी करत असल्याचा आरोप खाडेवर करण्यात आला आहे. पीडीत महिला ही विरारमधील रहिवासी आहे. तिनं थेट त्या भागात शिवसेना विभागप्रमुखाला चपलेनं मारल्यानं हे प्रकरण गाजत आहे.
सदरिल प्रकरण व्हायरल झाल्यानंतर जितू खाडे हा फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून सध्या जितूला पकल्याशिवाय या प्रकरणात अधिक माहिती मिळणार नाही.
आयटम चाहिये?, असं म्हणत एक महिला चक्क मारहाण करायला लागल्यानं त्या परिसरात उपस्थित असलेले नागरिक अचंबित झाले. या महिलेच्या तक्रारिनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेकडं सत्तेची सुत्र असल्यानं आता शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. परिणामी शिवसेना अधिक माहिती काय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे
श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये