युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला???; उद्धव यांचे संकेत

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना सगळ्यांना उत्सुकता आहे ती ‘युतीच्या’ जागा वाटपाची. ‘युती’ होणार हे आता सगळ्यांनीच मान्य केल्यानं कोण मोठा भाऊ? कोण छोटा भाऊ? याची चर्चा जोरात सुरू आहे. मित्र पक्षांना 18 जागा सोडण्याचं मान्य झालंय. शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचंही बोललं जात होत. लवकरच ‘युती’च्या जागावटपाची घोषणा होईल अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मी थोडी वेगळी पद्धत अवलंबली आहे. शिवसेनेला कुठल्या जागा असाव्यात याची यादी करायला मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलंय. ते आता आम्हाला किती आणि कुठल्या जागा द्यायच्या आहेत याची यादी देतील आणि मी ती आमच्या पक्षासमोर ठेवणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या खुलाश्यामुळे शिवसेना फार ताणून धरणार नाही असं बोललं जातंय. तर दोन्ही पक्षांदरम्यानची चर्चाही समाधानकारक असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. 

भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपासाठी बोलणी सुरू आहे. ही बोलणी अंतिम टप्प्यात आली असं कळतंय.

दरम्यान, शिवसेनेचे काही नेते मात्र 50:50 च्या जागा वाटपासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांनी 288 पैकी 144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –