रॉयल एनफिल्डसह बजाज आणि टीव्हीएसने देखील आपल्या ‘या’ बाईकसच्या किंमती वाढवल्या

नवी दिल्ली | कोरोना महामा.रीचा प्रा.दुर्भाव कमी झाल्यानंतर आता अनेक वाहन कंपन्या फायद्यात ठरत आहेत. अलीकडे काही महिन्यांमध्ये भारतीय वाहन कंपन्यांच्या वि.क्रीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशातच आता नवीन वर्षात अनेक कंपन्यांनी आपल्या हटके बाईक बाजारात उतरवल्या आहेत. तर काही कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किंमतींमध्ये वा.ढ केली आहे.

अशीच वाढ नवीन वर्षात रॉयल एनफील्ड, बजाज आणि टीव्हीएस यासारख्या कंपन्यांनी  देखील आपल्या स्पोर्ट्स आणि क्रूझर सोबत एडवें.चर सेगमेंटच्या प्रसिद्ध बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांना या कंपन्यांच्या गाड्या घेण्यासाठी थोडी ज्यादा रक्कम मोजावी लागणार आहे.

रॉयल एनफील्डने आपली सर्वात जास्त लोकप्रिय बाईक  RE Classic 350च्या किंमतीत वाढ केली आहे. ही बाईक नुकतीच लॉंच करण्यात आली होती. कंपनीने या बाईकच्या किंमतीत 4 हजार रुपयांची वाढ केली आहे.  या व्हे.रियंट्सची किंमत आता 1.78 लाख रुपये ते 1.93 लाख रुपये झाली आहे.

बुलेट सिरीजच्या बाईकची किंमत देखील कंपनीने वाढवली आहे. बुलेट सिरीजच्या बाईक्सची किंमत आता 1.27 लाख ते 1.43 लाख रुपये दरम्यान झाली आहे. रॉयल एनफील्डने मी.टियरच्या व्हे.रियंटच्या किंमतीत देखील वाढ केली आहे.

मी.टियर फा.यरबॉल व्हे.रियंटची किंमत 1.78 लाख रुपये, मी.टियर स्टे.लरची किंमत 1.84 लाख रुपये तर मी.टियर सु.परनो.वाची किंमत 1.93 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

बजाज कंपनीने देखील आपल्या Pulsar Series, Dominar 400, Dominar 250 आणि Av.enger Cr.uiser 220 या लोकप्रिय गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. कंपनीने Av.enger CR.uiser 220 या बाईकची किंमत 3 हजार 521 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे आता ही गाडी ख.रेदी करण्यासाठी 1.24 लाख रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे.

तसेच बजाज Dominar 400च्या किंमतीत 3 हजार 480 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. Dominar 250 च्या किंमतीत 3 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे Pulsar 220F ची किंमत 3 हजार 500 रुपयांनी, Pulsar NS160 ची किंमत 3 हजार रुपयांनी तर Pulsar NS200 ची किंमत 3 हजार 500 रुपयांनी वा.ढवण्यात आली आहे.

टीव्हीएस मो.टार कंपनीने देखील आपल्या आपाची सिरीजच्या बाईक्सच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. आपाची RTR 200 4V च्या किंमतीत २ हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून या बाईकची किंमत आता 1.33 लाख रुपये झाली आहे.

आपाची RTR 160 4V आणि आपाची RTR 180 या दोन्ही बाइक्सच्या किंमतीत 1770 रुपयांची वा.ढ करण्यात आली आहे. तसेच आपाची RTR 160च्या किंमतीत 1520 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-