नांदेड | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर भाजपने (BJP) कडाडून टीका केली आहे. यावरून नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय.
नवी वाईन पॉलिसी ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असल्याचे सरकार सांगत आहे. वाईनच्या माध्यमातून महसूल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवविण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांनाचा गांजा विक्रीची परवानगी द्यावी असा टोला प्रताप पाटील चिखलीकर यांनी लागावला आहे.
देगलूर तालुक्यातील येरगी गावात आज पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्याचा सामूहिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर चिखलीकर यांनी पत्रकारांशी स्ंवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केलीये.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तसेच महसूल वाढीसाठी राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना गांजाचे पिक घेण्याची देखील परवानगी द्यावी. गांजा पिकवण्याची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, सोबतच महसूल देखील वाढेल असा टोला चिखलीकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही तर महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिलाय.
शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमकं आहे तरी कुणाचं?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मला सचिन तेंडूलकरची दया येते, त्याकाळी…”, रावडपिंडी एक्सप्रेसचं मोठं वक्तव्य
भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध??? धक्कादायक वृत्त समोर
सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार