मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, दिल्लीच्या पातशहांच्या…

औरंगाबाद | आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे. आजच्याच दिवशी मराठवाडा हैदराबादच्या (Hyderabad) नवाब मीर उस्मानअलीच्या (Nawab Mir Osman Ali) राज्यातून मुक्त झाला आणि आजच्याच दिवशी हैदराबाद संस्थान (Hyderabad State) भारतात विलीन करण्यात आले.

त्यामुळे आज देशात केंद्रीय पातळीवर हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्यात येत आहे. तेलंगणा (Telangana) राज्यात राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येत आहे. आणि महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तीदिन साजरा होत आहे.

त्यामुळे आजच्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता, महाराष्ट्रात सर्व पक्षांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये देखील एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आता एकनाथ शिंदे यांच्या या कार्यक्रमावरून शिवसेना आक्रमक झाली आहे आणि त्यांनी यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळी नाही. दिल्लीच्या पातशहाच्या आदेशावरुन ते दिल्लीला जातात. आणि त्यांच्या सांगण्यावरुन निर्णय घेतात, असे विधान परीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) म्हणाले आहेत.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नसल्याचा आरोप दानवेंनी केला. कारण दरवर्षी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम केला जातो. परंतु मुख्यमंत्री सात वाजता आले आणि कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्र्यांनी केवळ पंधरा मिनिटांत हा कार्यक्रम आटोपल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. त्यामुळे आता शिवसेना दिवसभर मराठवाडा मुक्तीसंग्रामचा दणक्यात कार्यक्रम साजरा करणार असल्याचे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री आज हैद्राबादला जाणार आहेत. कारण आज हैद्राबादमध्ये कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हजेरी लावणार आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

लहानग्यांसाठी खूशखबर; पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी गृहपाठ होणार बंद!

दसरा मेळाव्याला ‘शिवजी पार्क’ सुने सुने राहणार!

WhatsApp वापरणाऱ्यांना मोठा झटका; पुढील महिन्यापासून ‘या’ फोनमध्ये नाही चालणार WhatsApp

Electric Vehicles घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर

“मुख्यमंत्र्यांना एकही गोष्ट माहित नाही, त्यांना पत्रकारांनी ट्रान्सहार्बरबद्दल प्रश्न विचारला आणि…” – आदित्य ठाकरेंची मोठी टीका