नारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

नवी दिल्ली | रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर काढला आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोरोना नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 54 हजारहून अधिक झाली आहे. मुंबई कोरोनामय झाली आहे. या कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची होती. मात्र महाविकास आघाडीचं सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

सर्वाधिक 1 हजार कोरोना मृत्यू मुंबईत झाले आहेत. अशास्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचं सरकार येईल असं मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचं सरकार येईल. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीमुळे महायुतीचं सरकार येईल असं नाही, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात; डॉक्टरांकडून टाळ्या वाजवून कौतुक

-सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

-‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींंचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

-जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे पाटील