नवी दिल्ली | रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine) सध्या घणघोर युद्ध चालू आहे. रशियन सैन्य मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये हल्ले करत आहे.
रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कसल्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्याचा आदेश सैनिकांना दिला आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर आता रशियन सैन्याकडून युक्रेनवरील कारवाईत भर टाकण्यात येत आहे. रशियाच्या तिन्ही सेना हल्ले करत आहेत.
मिसाईलनं हल्ले केले जात असल्यानं युक्रेनमधील अनेक शहर बेचिराख झाले आहेत. अशात विविध देशांच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या प्रवासावर असलेल्या एका अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळं जागतीक स्तरावर मोठा संघर्ष उद्भवला आहे. अमेरिकेकडून सातत्यानं रशियाला इशारे देण्यात येत आहे. अशातच अमेरिका-रशिया संघर्ष वाढण्यासारखी घटना घडली आहे.
रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. 17 तारखेला झालेल्या हल्ल्यात हा मृत्यू झाल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
जेम्स व्हिटनी हिल असं या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव सांगण्यात येत आहे. परिणामी अमेरिकेत तणावाची परिस्थिती आहे.
दरम्यान, हिल यांनी फेसबुकवर लिहीलेल्या गोष्टींची माहिती मिळत आहे. युक्रेनच्या परिस्थितीवर हिल यांनी खूप लिखाण केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
उन्हाळा वाढतोय काळजी घ्या! येत्या 48 तासात राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार
“महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात”, भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ
बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट
‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा
जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!