“लग्न लावायला गड किल्ले कशाला हवे होते… वर्षा बंगला पुरेसा होता की”!

मुंबई |  लग्न लावायला गड कशाला हवेत? वर्षा बंगलाही पुरेसा होता की… अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी राज्य सरकारच्या किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे.

किल्ल्यांवर हॉटेल, रिसॉर्ट बांधून हे किल्ले लग्न समारंभ आणि कार्यक्रमांसाठी देण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर हाच मुद्दा पकडून खोपकर यांनी एक ट्विट करत राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली.

शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर लग्न लावण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या मुंबईमधील मलबार हिल्स येथील वर्षा या निवासस्थानी लग्न लावावीत, असं त्यांनी ट्वीट करून अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

दरम्यान, विरोधी पक्षासहित शिवप्रेमींचा संताप अनावर झाल्यावर आणि त्यांच्या भावना लक्षात घेता शिवाजी महाराजांच्या एकाही गडकिल्ल्याला हात लावणार नाही, असं स्पष्टीकरण पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलं आहे.

Amey Khopkar 1

महत्वाच्या बातम्या-