मुंबई | तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अश्यात आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी विरूद्ध शिवसेना-मनसे असा वाद निर्माण झालाय.
राज्यात 19 फेब्रवारी आणि तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यात येते. तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली होती. याला मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे, असंही मिटकरी म्हणाले होते. यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर (Ameya Khokpkar) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं म्हटलं आहे. याला मिटकरींनीही प्रत्युत्तर दिलंय.
आमदार अमोल मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे, असंही मिटकरी म्हणालेत.
मिटकरी फालतू राजकारण करू नका. तुम्हाला नेहमीच फालतू राजकारण करायची सवय आहे. प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला? कुठल्या गोष्टीचं राजकारण करता, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असं अमेय खोपकर म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पेट्रोल डिझेलनंतर गॅस दरवाढीचा भडका; आता सिलेंडरसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
संस्कार, संस्कृती, सन्मान…; 125 वर्षीय स्वामी शिवानंदांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक
‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…’; संजय राऊतांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मोठी बातमी! सर्वसामान्यांना महागाईचा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं
‘कोरोना संपलेला नाही अजून…’, अमेरिकेतील दिग्गज डॉक्टराचा जगाला अत्यंत गंभीर इशारा