अमेरिका ते भारत… ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असलेल्या अमेय वाघचा चित्तथरारक अनुभव

मुंबई | अभिनेता अमेय वाघ एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र कोरोनामुळे त्याच्या नाटकाचे 14 पैकी 11 प्रयोग रद्द झाले आणि तो भारतात परतला. कोरोना अमेरिकेतही वाढल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींना सोमोरे जावे लागलं. अमेयने स्वत: आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगितला आहे.

या व्हिडीओत अमेयने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्रशासनाचं, विमानतळावर कोरोना टेस्ट घेणारे डॉक्टर, पोलीस आणि सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत धन्यवाद मानले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना होऊ नये यासाठी उत्तम उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही अमेरिकेत आल्यामुळे हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का बसलेला आहे, असं अमेय वाघ म्हणाला.

काल मुंबईत आमचं विमान लँड झालं. विमानतळावर अत्यंत जलद गतीने सर्वांची कोरोनाची टेस्ट घेतली गेली. विशेष म्हणजे मला याचं कौतुक वाटलं की टेस्ट घेणारे वैद्यकीय विद्यार्थी किंवा तरुण डॉक्टर होते. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करत असल्याचं अमेयनं सांगितलं.

https://www.facebook.com/1623426732/videos/10220141295395637/?t=2

 

महत्वाच्या बातम्या-

-“ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलंच नाही.”

-उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार!; कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

-“देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या”

-मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका- मुख्यमंत्री

-राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 49वर; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती