मुंबई | बॉलीवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. चित्रपट सृष्टीतील अनेक बडे कलाकार सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी सतत काही न काही शेअर करत असतात. यामुळे अनेक दिग्गज कलाकार आपल्या चाहत्यांशी जोडले जातात.
अभिनेता अमीर खान देखील सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी सतत काही न काही शेअर करत असतो. आपल्या चाहत्यांना सोशल मिडीयावरून तो शुभेच्छा देखील देत असतो. बॉलीवूड मधील हाच मिस्टर परफेक्ट त्याच्या एका पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
अमीर खानची एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अमीर खान सर्वांची हात जोडून माफी मागत आहे. मात्र, अमीर खानचे हात जोडून माफी मागण्यामागचं नेमकं कारण काय आहे?, याविषयी आज आपण जाणून घेवूयात.
अमीर खान हा बॉलीवूड मधील एक संवेदनशील अभिनेता आहे. तो आपल्या प्रत्येकच चित्रपटातून चांगला संदेश देत असतो. मिस्टर परफेक्ट अनेक सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतो. मात्र, अशातच अमीर खानने काही दिवसांपूर्वी ट्वीटरवरून एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये अमीर खान हात जोडलेला दिसत आहे. तसेच त्याने या फोटोवर ‘मिच्छामी दुक्कड़म’ असा कॅप्शन दिला आहे. मिच्छामी दुक्कड़म म्हणजेच मी तुम्हा सर्वांची हात जोडून माफी मागतो. जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा.
या ट्वीटवर अमीरच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांनी कमेंट्समध्ये अमीर खानची फिरकीही घेतली आहे. बरेच चाहते अमीरच्या या पोस्टवर आम्ही तुम्हाला माफ केलं, असं म्हणत आहेत. तर आमिरचे अनेक चाहते मिश्कील अंदाजात कमेंट्समध्ये त्याचे कौतुक करत आहेत.
मिच्छामी दुक्कड़म हा बंगालमध्ये साजरा केला जाणारा एक सन आहे. बंगालमध्ये हा सन खूप उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला प्रत्येकजण एकमेकांची माफी मागत असतात. मिच्छामी दुक्कड़म असं जैन धर्मामध्ये देखील म्हटलं जातं.
दरम्यान, अमीर खान लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अमीर खानचा ‘लाल सिंह चड्डा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिरचे अनेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी मोठा झटका! लवकरंच ट्रम्प यांना अ.टक होणार?
‘मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका’; तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा, नक्की भानगड काय आहे?
‘अर्णव तुला भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा’; ‘या’ बड्या अभिनेत्याचा गोस्वामींला इशारा
श्रीदेवीच्या रहस्यमयी मृ.त्यूचा पडदा फाश, समोर आलं मृ.त्यूचं धक्कादायक कारण!
दोनवेळा विवाह करून देखील ‘हा’ बडा दिग्दर्शक 21 वर्षाच्या मुलीला डेट करतोय!