रांची |2024 पर्यंत देशातील सर्व घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते झारखंड येथील चक्रधरपूर आणि बहारगोडा येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.
2024 पर्यत देशात एनआरसी लागू करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यत देशातील घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल, असं मोठं वक्तव्य अमित शहा यांनी सभेत बोलताना केलं आहे.
2024 पर्यंत घुसखोरांची ओळख पटेल. त्यांनतर त्यांना बाहेर काढण्यात येईल. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, त्यांना बाहेर काढू नका. ते काय खातील? कुठे जातील? पण देशाच्या हितसंबंधाशी तडजोड केली जाणार नाही, असंही शहा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आसामनंतर भाजपने संपूर्ण देशात एनआरसी लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे देशात अवैधरीत्या राहणाऱ्यांना देशाच्या बाहेर काढण्याची शक्यता आहे. भाजपच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘चांद्रयान 2’ मोहिमेतील विक्रम लँडरचा पत्ता लागला! – https://t.co/HpWGwFtfQk #Chandrayaan2 @NASA #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
भाजपचा गढ असलेल्या पूर्व विदर्भात शिवसेनेला वर्चस्वाची संधी – https://t.co/yYwY2YQoRS @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंचा पराभव झाला नसून त्यांना पाडण्यात आलं”https://t.co/WSqthFGADx @EknathKhadseBJP @Rohini_khadse @Pankajamunde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019