अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बुधवारी अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची तब्येत चांगली असल्याचे गुजरात भाजप नेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे.
मंगळवारी सायंकाळी अमित शहा अहमदाबाद येथे आले आणि बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यानंतर सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले.
सुरवातीला अमित शहा नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचे सांगितले गेले होते. मात्र नंतर त्यांना मानेवर गाठ आली होती आणि ती शस्त्रक्रिया करून काढून टाकली गेली असे सांगितले गेले. अहमदाबादच्या के. डी. हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली गेली.
त्वचा आणि स्नायू यांच्या मध्ये वाढणाऱ्या गाठीला ‘लीम्पोमा’ असे म्हटले जाते. अमीत शहा यांना या प्रकारची गाठ आली होती ती शस्त्रक्रियेने काढून टाकली गेली. ते उद्या दिल्लीला परततील असे समजते.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात अल्पवयीन प्रेयसीची लॉजवर हत्या करुन प्रियकर पसार! – https://t.co/dx5ZdEdDCC #Pune
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
“मी इच्छुकांना वैतागून नगरला येणं टाळतो” – https://t.co/VAjqXfAEKC @drsujayvikhe
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
रोहित पवारांच्या उपस्थितीत सरपंचासह भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश- https://t.co/zl4WRtYA3p #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019