भाजपच्या खासदारांना मिळणार अमित शहांचा मंत्र!

नवी दिल्ली : भाजपच्या सर्व खासदारांना आज शहा मंत्र मिळणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सर्व भाजप खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद होणार आहे.

सर्व राज्यातल्या भाजपच्या खासदारांना त्यासाठी आपापल्या राज्य मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त अमित शहा खासदारांशी हा संवाद साधणार आहेत.

22 सप्टेंबरला भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार असून, त्यांच्याकडून याबाबत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा ते आढावा घेण्याची शक्यता आहे.

निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याची उत्सुकता असून अमित शहा युतीबाबत शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-