उत्तर प्रदेशात भाषणादरम्यान अमित शहांची जीभ घसरली, म्हणाले…

नवी दिल्ली | देेशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सध्या उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे वर्लड डेअरी समेट 2022 (World Diary Summit 2022) या कार्यक्रमात सहभागी आहेत. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या भाषणात एक चूक केली.

त्यांनी केलेल्या त्यांच्या चुकीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. विरोधी पक्ष आणि भाजपेत्तर मंडळी सध्या त्यांच्या या चुकीची चांगलीच थट्टा करत आहेत.

सभेला संबोधित करताना शहा म्हणाले, सन 1969 – 70 काळात भारतात प्रति व्यक्ती 40 ग्राम दूध उपलब्ध होते. पण आज कोऑपरेटिव्ह डेअरी योजनेच्या कारणामुळे भारतात आज प्रति व्यक्ती 155 ग्राम दूध उपलब्ध आहे.

यावेळी त्यांनी दुधाचे मोजमाप करताना लिटर किंवा मिलीलिटर ऐवजी ग्राम हे घण पदार्थाचे मोजमाप वापरले. त्यामुळे आता लोक त्यांचे वस्तू मोजण्याचे एकक कच्चे आहे, असे म्हणत आहेत.

काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत (Surendra Rajput) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे घ्या, श्री अमित शहा दुधाला ग्राममध्ये मोजत आहेत. लिटर वा मिलीलिटरमध्ये नाही, असे राजपूत म्हणाले.

आपने सुद्धा यावेळी आपले मत नोंदवत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपचे अमित शहा दुधाला ग्राममध्ये मोजतात, तर काँग्रेसचे राहूल गांधी पिठाला लिटरमध्ये मोजतात, दोनही पक्षांकडे आपापले पप्पू आहेत, अशी टीका आप नेते आशुतोष सेंगर (Ashutosh Sengar) यांनी केली आहे.

काँग्रेस नेते नितीन अग्रवाल (Nitin Agarwal) यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले आहेत की, भारत केवळ 155 ग्राम दूध उत्पादन करत आहे. आणि गृहमंत्र्यांच्या लेखी ही खूप मोठी उपलब्धी आहे, कोणत्या मिडियामध्ये हा व्हिडिओ चालविण्याची हिंमत आहे का?

महत्वाच्या बातम्या –

दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; खाद्यतेलांच्या किंमतीत घट, जाणून घ्या सविस्तर वृत्त

मविआचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशमुखांच्या अडचणी वाढल्या

बंगालमध्ये मोर्च्यादरम्यान भाजपचा मोठा हिंसाचार; पोलिसांचा बळाचा वापर

“ज्या मुलीने वयाच्या 13 व्या वर्षी घाण्यारड्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळविली…” किशोरी पेडणेरकरांचा मोठा दावा

पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही या अजित पवारांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर