मुंबई : महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये महापूरामुळे झालेल्या नुकसानीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हळहळ व्यक्त केली आहे. महापूरामुळे झालेल्या नुकसानीचा राज्य सरकारांनी तातडीने अंदाज घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असं अवाहन अमित शहांनी दिला आहे.
पश्चिम विभागीय परिषदेच्या 24व्या बैठकीचं अमित शहांच्या अध्यक्ष्यतेखाली आयोजन करण्यात आलं. या बैठकीला गोवा, महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय प्रमुख, दीव-दमण आणि दादर-हवेलीचे केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आराखडा, बँकिंग सुविधेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडणे, थेट लाभार्थी योजनेशी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून माहितीचं संकलन करणं, अशा विविध विषयांवर 23 व्या बैठकीत चर्चा झाली होती.
मच्छीमारांना क्यूआर कोड प्रणालीचे ओळखपत्र आणि पास्को कायद्यातील तरतुंदींविषयी तपशीलावरही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, या सर्व बाबींंवर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची सूचना अमित शहांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं त्यांच्यावर सूड घेऊन आम्हाला कोणता लाभ?”
-“तुम्ही कितीही चौकशी करा, माझं तोंड मी बंद करणार नाही”
-…मग मी बोलले तर कुठे बिघडलं- अंजली दमानिया
-अजित पवारांसह या मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
-एनएसयूआयच्या विद्यर्थ्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला घातला चपलेचा हार