देश

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; राहुल गांधी म्हणाले…

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात शहा  यांनीच स्वत: ट्विट करून माहिती दिली आहे. काँग्रेल नेते राहुल गांधी यांना ही माहिती कळताच त्यांनी शहा यांना लवकर बरं होण्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमितजींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशा सदिच्छा राहुल गांधी यांनी दिल्या आहेत. राहुल गांधींनी एका ओळीचं ट्विट करत अमित शहा यांना बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

अमित शहा यांना कोरोना झाल्याची माहिती समजताच राजकीय पक्षातील नेत्यांनी, लोकप्रतिनिधी आणि कलाकारांनी ट्विट करत लवकर बरे व्हा अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली आणि त्या चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहे, असं अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

कौतूकास्पद! सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी गौतम गंभीरने उचललं मोठं पाऊल!

बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र- जितेंद्र आव्हाड

‘तो क्षण जेव्हा मी त्याला हो म्हणाले..’; सोनाली कुलकर्णीने चाहत्यांसोबत शेअर केली गोड आठवण

राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलं आहे; भाजपच्या ‘या’ खासदाराचा घरचा आहेर!

‘…म्हणून मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह’; अभिषेक बच्चनने सांगितले कारण!