मुंबई | विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा आज लगोलग मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी कलम 370 मुद्द्यावरून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तुम्ही कोणाला साथ देणार काँग्रेस राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला की भाजपच्या राष्ट्रहिताला? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी निर्लज्जपणे कलम 370 हटवण्याचा विरोध करत आहेत. परंतू काश्मीरमधून कलम 370 न हटवणं हा काँग्रेससाठी राजकीय मुद्दा होता, मात्र कलम 370 हटवणं हा भाजपसाठी भारताला एकसंघ ठेवण्याचा मुद्दा आहे, असं शहा म्हणाले.
भ्रष्टाचार नसता तर प्रत्येक काश्मीरी नागरिकाच्या घराच्या छतावर सोन्याचे पत्रे असते. भारताचा मुकूटमणी काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करुन विकासाच्या मार्गावर नेण्याची हमी देतो असंही शहा म्हणाले.
भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मीरसाठी पहिलं बलिदान दिलं. आमच्यासाठी काश्मिरच्या मुद्दा अस्मितेचा आहे, असं शहा यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज अमित शहा आपल्या भाषणात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. युतीच्या मुद्द्यावर त्यांनी अवाक्षरही काढलं नाही. विधानसभा निवडणुकीत कलम 370 ला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा, असं म्हणत कलम 370 मुद्द्यावरूनच विधानसभेचा प्रचार करायचा असं भाजपचं ठरलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या-