सुशांत-दिशा प्रकरणी अमित शहांचं नितेश राणेंना पत्र; पत्रात म्हणाले…

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय सुशांत प्रकरनातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप सुशांतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती हे स्पष्ट होऊ शकलं नाही. सुशांत प्रकरणाला राजकीय वळणही प्राप्त झालं आहे.

सुशांतच्या मृ.त्युच्या काही दिवस अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सलियनचा मृ.त्यू झाला होता. यामुळे दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. 8 जून रोजी दिशानं तिच्या मलाड येथील फ्लॅटवरून कथितरीत्या उडी टाकून आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप तिच्या मृ.त्युचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. भाजप नेते नितेश राणे यांनी सुशांत दिशा प्रकरणात हस्तक्षेप करत अमित शहा यांना पत्र लिहीलं होतं.

ज्या दिवशी दिशानं कथितरीत्या आ.त्मह.त्या केली त्यावेळी दिशाचा बॉयफ्रेंड रोहन रॉय सुद्धा तिथेच उपस्थित होता. सुशांत प्रकरणी रोहनकडून महत्वाची माहिती मिळू शकते. यामुळे नितेश राणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित रोहनच्या सुरक्षेची मागणी केली होती. अमित शहा यांनी नितेश राणे यांच्या या पत्राला आता उत्तर दिलं आहे.

श्री नितेश नारायण राणे जी 16 सप्टेंबर 2020ला तुमचं पत्र आम्हाला मिळालं. या पत्राद्वारे तुम्ही रोहन रॉयच्या सुरक्षेची विनंती केली आहे. याप्रकरणी सर्व गोष्टींचा अभ्यास करत योग्य कारवाई केली जाईल, असं अमित शहा यांनी नितेश राणेंना पत्राद्वारे उत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात सुशांत प्रकरणी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. दिशाचा बॉयफ्रेंड रोहनची मुंबई पोलिसांनी केव्हाच चौकशी केली नाही. रोहनची चौकशी केली असती तर 8 जूनच्या त्या घटनेविषयी माहिती मिळू शकली असती, असं नितेश राणे यांनी या पत्रात म्हटलं होतं.

तसेच जेव्हा दिशानं कथितरीत्या उडी मारली तेव्हा रोहन सुद्धा त्याच फ्लॅटमध्ये उपस्थित होता. मात्र, तरीही दिशानं उडी घेतल्याच्या 20-25 मिनिट नंतर रोहन बिल्डींगच्या खाली आला होता. रोहनची हीच गोष्ट संशयास्पद आहे, अशीही शंका नितेश राणे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली होती.

रोहन स्वतः मुंबई सोडून गेला होता किंवा रोहनला दुसऱ्या कोणीतरी तपासापासून वाचण्यासाठी मुंबई सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. काही प्रभावशाली व्यक्तींद्वारे रोहनवर दबाव टाकला जात असावा ज्यामुळे रोहन मुंबईत येण्यासाठी घाबरत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी रोहनसाठी सुरक्षेची व्यवस्था करावी ज्यामुळे तो मुंबईत येवू शकेल, अशी मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे केली होती.

दरम्यान, रोहन रॉयचा जबाब सुशांत प्रकरणी सीबीआयच्या खूप उपयोगी येवू शकतो. कारण दिशा आणि सुशांतच्या मृ.त्यूचा नक्कीच संबंध आहे, असंही राणे यांनी पत्राद्वारे अमित शहा यांना म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

“सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती?”

सुशांत प्रकरणी कलम 302 लागणार? ‘या’ कारणानं सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर

…अन् तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

अभिनेता सोनू सूद आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित!

‘अनुराग कश्यप पोलिसांना खोटं बोलत आहे’; अनुरागच्या ‘त्या’ स्टेटमेंटवर पायल घोष भडकली