…अन्यथा त्यांना कोरोनाविरोधात लढणारे योद्धे म्हणण्याला अर्थ नाही; अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई |कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या संकटाच्या काळात पोलीस, डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे.

अनेक डॉक्टर, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. मात्र अनेकांप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या मानधनात कपात केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.

राज्यभरातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरीही अपुरेच आहेत, इतकं उत्कृष्ट काम शासकीय सेवेतील डॉक्टर्स निष्ठेने करत आहेत. या डॉक्टरांना देण्यात येणारं मानधनात सरकारने कपात करणं हे कोणत्याही दृष्टीने पटणार नाही, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे.  नव्या आदेशानुसार त्यांच्या पगारात सुमारे 20 हजार रुपये कपात होणार आहे. या आदेशामुळे तरुण डॉक्टरांच्या मनात असंतोषाचे वातावरण असून ही मानधन कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरेंनी पत्रात नमूद केलं आहे.

वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस यांना त्यांचे पूर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधानाला कोणताही अर्थ उरणार नाही असा टोलाही मनसे नेते अमित ठाकरे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल

-तुम्ही कोणत्या झोनमध्ये? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

-“सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा”

-चीनपासून वेगळं असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला इशारा