Top news मनोरंजन

कामगारांचा पोटाचा प्रश्न सोडवण्याठी बीग बी अमिताभ बच्चन यांचा पुढाकार

मुंबई |  लॉकडाऊन असल्याने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मजुर-कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांचे खाण्याचे हाल होऊ लागले आहेत. अशा कठीण प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावतीने एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव गरजूंना मदत करत आहेत. त्यांनी हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने दररोज शिजवलेल्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी 28 मार्च पासूनच अरब गली, अंटोप हिल, वर्ली लोटस, माहिम दर्गा , हाजी अली दर्गा, धारावी आणि सियोन मुंबईच्या या ठिकाणी अन्नाचं वाटप करण्यास सुरूवात केली आहे. पुणे मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

दरम्यान, अमिताब बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना या कामाची खबर लागू नये म्हणून याचा कुठेही गाजावाजा केला नाही. बच्चन यांनी पायी जाणाऱ्या मजुरांच्या प्रवासासाठी देखील मदत केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आकडे जेवढे वाढतील, तेवढं लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ; विरोधकांना सत्ता नसल्याने अपचन”

-देशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक

-अगोदर लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं, राजकारणाला भरपूर वेळ पडलाय- आदित्य ठाकरे

-केंद्राकडून राज्याला कोरोनाविरुद्ध उपाययोजनेसाठी एकही पैसा मिळाला नाही- वडेट्टीवार

-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतल्या आकडेवारीवर पृथ्वीराज चव्हाणांचं चॅलेंज, म्हणाले…