बीगबींनी केलं रोहित शर्माच तोंडभरून कौतुक

मुंबई | धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने शेवटच्या चेंडूवर सलग खणखणीत षटकार मारून भारताला न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला.

भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. या विजयाचा आनंद संपूर्ण देशवासीयांसोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील साजरा करत आहेत. भारताचा विजय झाल्यानंतर बच्चन यांनी एक ट्विट केलं आहे.

रोहित शर्माने मारलेल्या शेवटच्या षटकाराचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांनी भारतीय क्रिकेट संघाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘अविश्वसनीय’ असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या- 

-…तर भाजपने मला कधी ओळखलंच नाही- मुख्यमंत्री

-महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”

-शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही- सुधीर मुनगंटीवार

-सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-“देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात आहे”