ऋषी कपूर यांच्या निधनानंतर केलेलं ट्विट अमिताभ बच्चन यांच्याकडून डिलीट!

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. ऋषी कपूर गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. गुरुवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर बॉलिवूडसह त्यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सर्वात आधी ट्विट करत शोक व्यक्त करणाऱ्यांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा समावेश होता. पण हे ट्विट अमिताभ बच्चन यांनी डिलीट केलं असून त्यांच्या ट्विटरला आता दिसत नाही.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट डिलीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते गेले… ऋषी कपूर गेले….त्यांचं निधन झालं….मी उद्ध्वस्त झालो आहे, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

दरम्यान, अमिताभ यांनी हे ट्विट डिलीट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यामागचं नेमकं कारण काय असावं याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

-इरफान-ऋषींची एकापाठोपाठ एक एक्झिट; ‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम

-गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

-पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

-“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

-एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे