नवी दिल्ली | टीव्हीवरील काही कार्यक्रमांची एक वेगळीच छाप दर्शकांवर पडलेली असते. त्यातील एक आहे ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम. दर्शकांच्या विशेष पसंतीस पडलेला हा कार्यक्रम आहे.
यात चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याविषयी स्पर्धकांना प्रश्न विचारले जातात. या गोष्टींमुळे अनेक दर्शक हा कार्यक्रम पाहतात. गेल्या 11 वर्षांपासून केबीसी हा फक्त मनोरंजन करत नाही तर लोकांच्या ज्ञानातही भर घालत आहे.
त्याचबरोबर लोकांनी पाहिलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास हा कार्यक्रम मदत करत आहे. केबीसीमध्ये हे सर्व प्रश्न स्पर्धकांना अभिनेता अमिताभ बच्चन विचारत असतात. मात्र, केबीसीच्या इतिहासात कधीच न घडलेली एक घटना नुकतीच घडली आहे. ही घटना पाहून महानायकही चकित झले आहेत.
13 ऑक्टोबरचा ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाचा भाग खूपच विशेष होता. या भागाची सुरवात पटणातील राजलक्ष्मी यांच्यापासून झाली. बिग बी यांच्यासमोर हॉटसीटवर राजलक्ष्मी बसल्या होत्या. त्यांनी उत्तम खेळत 12,50,000 रुपये जिंकले.
त्यानंतर राजलक्ष्मी यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम सर्वात जलद उत्तर देऊन महाराष्ट्रातील स्वप्निल हे हॉटसीटवर आले. सर्व अगदी सुरळित चालले होते. बिग बी स्वप्निल यांना प्रश्न विचारणार, तेवढ्यात अचानक संगणक बंद झाला. हे पाहून बिग बी चकितच झाले.
ही अशी परिस्थिती केबीसीच्या इतिहासात प्रथमच घडली. त्यावेळी बिग बी म्हणाले, संगणक बंद झाला आहे. ही स्थिती अगदी काही सेकंदापुरतीच होती.
अमिताभ बच्चन यांनी स्वप्नीलला प्रश्न विचारल्यानंतर हुटर वाजला आणि त्यानंतर बिग बी यांना या कार्यक्रमात मध्येच थांबावे लागले. काही वेळानंतर पुन्हा सर्व पहिल्यासारखे सुरळित झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्णब गोस्वामीला मोठा धक्का! आता ‘या’ प्रकरणी पाय आणखी खोलात
‘…म्हणून वडिलांचा जीव वाचवता आला नाही’; रितेश देशमुखनं सांगितलं विलासरावांच्या मृ.त्यूचं खरं कारण
भडकावू बातम्या पसरवणाऱ्या वाहिन्यांविरोधात पार्लेजी कंपनीनं घेतला मोठा निर्णय
सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी! रियाला पाठींबा देत म्हणाला…
मित्रांच्या मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्याचे गिफ्ट; सोनू सूदही मदतीसाठी धावला