Top news आरोग्य मनोरंजन मुंबई

सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन यांची घोषणा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

नवी दिल्ली | नव्वदच्या दशकापासून एक अभिनेता अनेक चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करत होता. चित्रपट सृष्टीत त्यांची ओळख महानायक म्हणून होऊ लागली. या महानायकाचे नाव आहे अमिताभ बच्चन.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आणि आताही सत्याहत्तर वर्षांचे असतानाही उत्स्फूर्तपणे आपले काम करत आहे. सध्याच्या दिवसात अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या स्पर्धात्मक कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. पण या वेळी अमिताभ बच्चन हे एका खास कारणामुळे चर्चेत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे. ही माहिती अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

मंगळवारी मध्यरात्री त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ट्विटरवर त्यांनी एक फोटो शेअर केला. त्यात त्यांनी एक कोट घातलेला आहे. त्यावर एक हिरव्या रंगाची रिबन आहे. हे रिबन अवयवदानाचे संकल्पाचे प्रतीक आहे. अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्यांचे चाहते खूपच आनंदात आहे.

यातच अमिताभ बच्चन यांच्या कमेंट सेक्शनमध्ये काही ट्विटरवरील व्यक्तींनी त्यांनी स्वतः केलेल्या अवयवदानाचे प्रशस्तीपत्र शेअर केले आहे. त्यातच ट्विटरवरील त्यांचे चाहते स्वतः अवयवदान करण्याबाबत बोलत आहे तर काहींनी संकल्पही केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आज सकाळी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले की, पेंगोलिन मास्क घालून काम करण्यास जात आहे. रोज पंधरा तास काम करत आहे. हेच आपले आहे काम. या ट्विटसोबत त्यांनी त्यांचा फोटो शेअर केला आहे. सध्या अमिताभ बच्चन केबीसीच्या नव्या पर्वात दिसत आहे.

देशभरात सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा परिस्थितीतही अमिताभ बच्चन कामाबाबत खूपच तत्पर आहे. १३ सप्टेंबर रोजी अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले होते की, काम करण्यासाठी सर्वात चांगले दिवस ते असतात, जेव्हा बाकीचे आराम करत असतात. रविवारी ४ चित्रपट, ३ लघुपट, ६ क्रोमा शूट, स्टीलचे २ सेट, अशी माहिती त्यांनी दिली.

अमिताभ बच्चन ‘गुलाबो सिताबो’ या अखेरच्या चित्रपटात प्रेक्षकांना दिसले होते. सध्या कोरोना संकटामुळे हा चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेचे नाव मिर्जा होते. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमिताभ बच्चन हे ‘झुंड, चेहरे आणि ब्रम्हास्त्र’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना संपत नाही तोच चीनमध्ये आलं नवं संकट; आलाय ‘हा’ नवा व्हायरस

‘रिया शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याच्या संपर्कात होती’; सुशांतच्या मित्राचा धक्कादायक खुलासा!

धक्कादायक! मुंबईत आणखी एका अभिनेत्याची गळफा.स घेऊन आत्मह.त्या

अनुराग कश्यपला अट.क होणार? तब्बल 8 तास चौकशी करत पोलिसांनी अनुरागला…

सुशांत केसमध्ये खरंच अरबाज खानला अटक केलंय का?, जाणून घ्या काय आहे सत्य