जेव्हा बच्चन गडकरींना फोन करतात… अन् गडकरी म्हणतात ‘चल नाटक मत कर फोन रख!’

नागपूर | हॅलो मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ… असा जर आपल्या फोन आला तर कोणीतरी आपली गम्मत करतंय म्हणून आपण फोन कट करू. असाच फोन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना खूप वर्षांपूर्वी आला होता आणि तो फोन होता शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा. याच फोनचा किस्सा गडकरींनी नागपूरमध्ये गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

खूप दिवसांपूर्वी गडकरींना अमिताभ बच्चन यांचा फोन आला. हॅलो मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ… असा आवाज त्यांना पलिकडून आला. परंतू कोणीतरी आपली गम्मत करतंय म्हणून चल नाटक मत कर… फोन रख, असं म्हणत गडकरींनी खाडकन फोन ठेवून दिला.

पुन्हा एकदा बीग बी यांनी गडकरींना फोन केला. आणि पुन्हा एकदा आवाज आला मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ… मग ही गम्मत नसून आपल्याला खरंच बच्चन साहेबांचा फोन आल्याचं गडकरींच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर त्यांच्यात सविस्तर संभाषण झालं. हा रंगतदार किस्सा गडकरींनी त्यांच्या स्टाईतमध्ये सांगितला.

दरम्यान, नागपुरच्या मुलाखतीत गडकरींनी आपल्या शैलीत अनेक किस्से सांगितले. त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी यावेळी भूतकाळातील अनेक किश्श्यांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना चाखायला दिली.

महत्वाच्या बातम्या-